मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसाठी अर्ज आजपासून सुरू, अर्ज करण्यास ‘या’ 15 दिवसांचीच मुदत,अर्ज करा! – Ladki Bahini Yojana Online Apply
Online Application Form Ladki Bahini Yojana Maharashtra
विनामूल्य राहणार अर्ज भरण्याची प्रक्रिया, कसा कराल अर्ज जाणून घेऊया..
Registration Process, Application form submission details are given below. Eligible candidates can apply as per the instructions given below. Link will be available after some time on www.MahaBharti.in
अर्ज भरण्याची सुविधा – अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्र व महा- इ- सेवा केंद्रे येथे पात्र महिलांना योजनेचा अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक थोडयाच वेळात आम्ही अपडेट करु, तर ला भेट देत रहा किंवा या लिंक वरुन महाभरती ॲप डाऊनलोड करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपद्वारे/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन भरले जाऊ शकतात. हि लिंक थोड्याच वेळात आम्ही महाभरती वर अपडेट करू. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत/ वॉर्ड/ सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात / बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, सेतू सुविधा केंद्रांमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाइन प्रविष्ट केला जाईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामूल्य राहील, असे आदेशात शासन निर्णयात नमूद आहे.
अर्ज भरण्याची प्रक्रिया – Ladki Bahini Yojana Schedule
– अर्ज करण्याची सुरुवात : १ जुलै
– अर्ज करण्याची शेवट तारीख : १५ जुलै
– प्रारूप निवड यादी प्रकाशित : १६ ते २० जुलै
– प्रारूप यादीवर हरकत, तक्रार करणे : २१ ते ३० जुलै
– लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित : १ ऑगस्ट
– लाभ देण्यास सुरुवात : 14 ऑगस्टपासून
Ladki Bahini Yojana Eligibility Criteria
कोणत्या महिला असणार पात्र?
– महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक
– विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला
– वयाची किमान २१ वर्ष पूर्ण व कमाल ६० वर्ष मर्यादा
– अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक
– अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे
– अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल
– ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल, अशा महिला.
माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा १५०० रुपये कोणाला मिळणार ? त्याचा फॉर्म कसा भरायचा
ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक
ऑनलाइन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा
– आधार कार्ड आवश्यक
– राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला
– बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
– पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड
– योजनेच्या अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
– अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कॉल करा 8767836270


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणतेही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Offcial वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखे कोणतेही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागात Offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट विनंती करतो..
धन्यवाद... 🙏