💻 10 वी पास फ्री टॅबलेट योजना 2026 महाराष्ट्र मोबाईल मध्ये फॉर्म भरा | Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2026-28 Registration
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET-2026-28 करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महा ज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत Mahajyoti Tab व 6GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते. योजनेच्या लाभासाठी पात्रता खालील प्रमाणे (अ) : 1) उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी 2) उमेदवार हा इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी 3) उमेदवार हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा/असावी 4) जे विद्यार्थी सन 2026 मध्ये दहावीची परीक्षा पास झालेले आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश पत्र म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट व दहावीची गुणपत्रिका म्हणजेच दहावीचे मार्कशीट जोडावे. 5) विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्य...