ITI ADMISSION 2023 : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, आजच करा आपला अर्ज निश्चित या लिंकवरून...
राज्यातील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI Admission 2023) प्रवेश सोमवार (१२ जून) म्हणजेच आज पासून सुरू झाले आहेत. 20 जुलै रोजी पहिली प्रवेश यादी जाहीर होऊन प्रवेश सुरू होतील. विद्यार्थी https://admission.dvet.gov.in/ या वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. ITI प्रवेशासाठी 10वी उत्तीर्ण आणि किमान उमेदवार हा आठवी पास असावा. आयटीआय अभ्यासक्रमासाठी किमान शैक्षणिक पात्रता किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले 14 वर्षांवरील उमेदवार पात्र असतील. यावर्षी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करणे, नोंदणी शुल्क भरणे, पसंतीचे 'आयटीआय' निवडणे, अर्जात बदल करणे आणि हरकती नोंदवण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ITI ADMISSION 2023 आवश्यक कागदपत्रे : शाळा सोडल्याचा दाखला 10वी गुणपत्रिका जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र अपंगत्व/लष्करी/अल्पसंख्याक प्रमाणपत्र आधार कार्ड पासपोर्ट फोटो इ. दहावीनंतर पुढील शिक्षण घेऊन सरकारी नोकरी कुठे मिळेल, या विचाराने अनेकजण आयटीआयकडे वळत असल्याचे वास्तव आहे. आता तंत्रनिकेतन (Diploma In Engineering) सह अकरावीसाठी प्र...