ITI ADMISSION 2023 : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, आजच करा आपला अर्ज निश्चित या लिंकवरून...



 राज्यातील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI Admission 2023) प्रवेश सोमवार (१२ जून) म्हणजेच आज पासून सुरू झाले आहेत. 20 जुलै रोजी पहिली प्रवेश यादी जाहीर होऊन प्रवेश सुरू होतील. विद्यार्थी https://admission.dvet.gov.in/ या वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. ITI प्रवेशासाठी 10वी उत्तीर्ण आणि किमान उमेदवार हा आठवी पास असावा. आयटीआय अभ्यासक्रमासाठी किमान शैक्षणिक पात्रता किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले 14 वर्षांवरील उमेदवार पात्र असतील. यावर्षी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करणे, नोंदणी शुल्क भरणे, पसंतीचे 'आयटीआय' निवडणे, अर्जात बदल करणे आणि हरकती नोंदवण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.


ITI ADMISSION 2023 आवश्यक कागदपत्रे :

शाळा सोडल्याचा दाखला

10वी गुणपत्रिका

जातीचा दाखला

उत्पन्नाचा दाखला

नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र

अपंगत्व/लष्करी/अल्पसंख्याक प्रमाणपत्र

आधार कार्ड

पासपोर्ट फोटो इ.

दहावीनंतर पुढील शिक्षण घेऊन सरकारी नोकरी कुठे मिळेल, या विचाराने अनेकजण आयटीआयकडे वळत असल्याचे वास्तव आहे. आता तंत्रनिकेतन (Diploma In Engineering) सह अकरावीसाठी प्रवेश सुरू होत आहेत. त्यामुळे कोणत्या प्रवेशाला विद्यार्थ्यांना सर्वाधिक पसंती आहे, विद्यार्थ्यांचा कल काय आहे, हे ऑगस्टमध्ये स्पष्ट होणार आहे.


ITI ADMISSION 2023-24 SCHEDULE :

ऑनलाइन अर्जाची सुरवात : १२ जून ते ११ जुलै

पहिल्या फेरीसाठी संस्था पसंतीक्रम : १९ जून ते १२ जुलै

अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : १६ जुलै

पहिली प्रवेश फेरी : २० जुलै

द्वितीय प्रवेश फेरी : ३१ जुलै

दुसऱ्या यादीनुसार प्रवेश : १ ते ४ ऑगस्ट

तिसरी प्रवेश फेरी : ९ ऑगस्ट

चौथी प्रवेश फेरी : २० ऑगस्ट

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून एक किंवा दोन वर्षांचा ट्रेड (ITI Course) पूर्ण करून खाजगी नोकरी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षी सुमारे एक लाख तरुण आयटीआयमध्ये प्रवेश घेतात. 'आयटीआय'च्या माध्यमातून एकूण 82 प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात. यापैकी, फिटर आणि इलेक्ट्रिशियन या दोन अभ्यासक्रमांना सर्वाधिक मागणी आहे आणि त्या ट्रेडमधील 100% प्रवेश आहेत.


फी :-

General Category

Rs 150

SC/ST/OBC/ Other Reserved Categories

Rs 100

Non-Domicile Candidate

Rs 300

NRI Candidates

Rs 500


ITI Admission 2023


ITI ADMISSION 2023 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

☝️☝️☝️☝️☝️☝️

ऑनलाईन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा

वॉट्सअप

☝️☝️☝️


माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा ITI ADMISSION 2023 APPLICATION LINK AVAILABLE या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बांधकाम कामगार योजना अर्ज प्रक्रिया

पोलीस भरती-2025 महत्वाची अपडेट - या दिवसापासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात

Ladki Bahin Yojna 2026: अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना आता Offline कागदपत्रे जमा करता येणार! राज्य सरकारचा मोठा निर्णय, संपूर्ण माहिती इथे बघा