बांधकाम कामगार योजना अर्ज प्रक्रिया
ऑनलाइन फॉर्म कुठे आणि कसा भरायचा?
महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत पोर्टल वर ऑनलाईन अर्ज भरता येतो.
फॉर्म भरण्याची प्रक्रिया:
सर्वप्रथम नोंदणी करा:
ज्या कामगारांनी अद्याप स्वतःची नोंदणी केलेली नाही त्यांनी महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी.
नोंदणीसाठी कामगाराचा आधार क्रमांक, कायमस्वरूपाचा अथवा तात्पुरत्या पत्ता, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल.
आवश्यक योजनेची निवड करा:
महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवरलॉगिन केल्यानंतर तुम्हाला विविध योजना दिसतील .
तुम्हाला आवश्यक असलेल्या योजनेची निवडा करा आणि त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरा.
कागदपत्रे अपलोड करा:
अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
उदाहरणार्थ, आधार कार्ड, कामगार प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खाते तपशील इत्यादी.
अर्ज सबमिट करा आणि अर्ज क्रमांक मिळवा.
सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करा:
अर्ज सबमिट केल्यानंतर तुमच्या ई-मेल किंवा मोबाईलवर एक अर्ज क्रमांक (Application ID) मिळेल.
हा अर्ज क्रमांक भविष्यात अर्जाचा स्टेटस पाहण्यासाठी उपयोगी पडेल.
ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
सर्वसाधारण आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
पॅन कार्ड (असल्यास)
रहिवाशी पुरावा (रेशन कार्ड, वीज बिल)
बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र
९० दिवस बांधकाम काम केल्याचा पुरावा
पासपोर्ट साइज फोटो
बँक पासबुक झेरॉक्स
विशिष्ट योजनांसाठी अतिरिक्त कागदपत्रे:
शैक्षणिक योजना: शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, मागील वर्षाचे गुणपत्रक
प्रसूती सहाय्य: जन्म प्रमाणपत्र, रुग्णालयाचे डिस्चार्ज प्रमाणपत्र
मृत्यू सहाय्य: मृत्यू प्रमाणपत्र, पोस्टमार्टम रिपोर्ट (अपघाती मृत्यूसाठी)
अपंगत्व सहाय्य: अपंगत्व प्रमाणपत्र
अर्जाची स्थिती कशी पाहायची?
अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन Application Status विभागात अर्जाचा क्रमांक टाकून तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता.
अर्ज मंजूर झाल्यास लाभाची रक्कम थेट अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाईल
कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
उत्तर: बांधकाम कामगार योजनेचा अर्ज भरण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
आधार कार्ड, बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र, ९० दिवस बांधकाम केले असल्याचा पुरावा, बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट साइज फोटो, उत्पन्न प्रमाणपत्र (गरजेनुसार), इतर योजना-विशिष्ट कागदपत्रे
प्रश्न: योजनेचा अर्ज भरण्यासाठी पात्रता काय आहे?
उत्तर: अर्जदार हा १८ ते ६० वर्षांचा नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा आणि किमान ९० दिवस बांधकाम उद्योगात काम केलेले असावे.
प्रश्न: योजनेअंतर्गत केलेला अर्ज मंजूर होण्यास किती वेळ लागतो?
उत्तर: अर्ज सबमिट केल्यानंतर तो पडताळणीसाठी पाठवला जातो आणि सर्व कागदपत्रे योग्य असल्यास साधारणतः ३० ते ४५ दिवसांमध्ये लाभ दिला जातो.
प्रश्न: केलेल्या अर्जाची स्थिती (Status) कशी तपासावी?
उत्तर: अर्ज स्थिती तपासण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत पोर्टल वर जाऊन "Application Status" या पर्यायावर क्लिक करावे आणि अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पाहता येते.
प्रश्न: योजनेचा अर्ज मंजूर झाल्यानंतर पैसे कसे मिळतील?
उत्तर: अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित योजनेसाठी मिळणारी मदत थेट अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाते.
प्रश्न: अर्ज फेटाळला गेला तर काय करावे?
उत्तर: जर एखाद्या कारणामुळे योजनेचा अर्ज फेटाळला गेला तर त्याचे कारण जाणून घेण्यासाठी महामंडळाच्या वेबसाइटवर अर्ज स्थिती (Application Status) तपासा. आवश्यक कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या सुधारून पुन्हा अर्ज करा.
निष्कर्ष:
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म म्हणजे कामगारांना आर्थिक मदत, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने दिलेली एक ऑनलाईन स्वरूपातील सुविधा आहे. यामध्ये अर्जदार कामगाराला घरी बसून स्वतःच्या मोबाईल च्या सहाय्याने ऑनलाईन अर्ज भरता येतो ज्यामुळे अर्जात कामगाराचा वेळ आणि पैशांची बचत होती तसेच ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पारदर्शकपणे केली जाते. त्यामुळे आमची कामगारांना विनंती आहे कि त्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपल्या गरजेनुसार योजनेचा अर्ज भरून लाभ घ्यावा
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणतेही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Offcial वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखे कोणतेही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागात Offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट विनंती करतो..
धन्यवाद... 🙏