शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना | आत्ता ई-पीक पाहणी करणे झाले अनिवार्य | Important notice for farmers | E-Peak inspection has now become mandatory
Important notice for farmers | E-Peak inspection has now become mandatory
![]() |
पीक पाहणी मोबाईल अँपच्या साहाय्याने सर्व खातेदार शेतकरी तलाठ्याकडे न जाता आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून आपल्या 7/12 वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई पीक नोंदणी प्रकल्प हा 01 ऑगस्टपासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे.
सध्या खरीप हंगामाच्या पीक पाहणीची कार्याहावाही सुरु आहे. खरीप हंगामाच्या पीक पाहणीच्या नोंदी साठी ई-पीक पाहणी चे 2.0मोबाईल अॅपचे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. तरी सर्व खातेदार शेतकरी यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामातील पिकांची ई- पीक पाहणी नोंदवण्याची शेवटची मुदत १५ ऑक्टोंबर २०२२ हि आहे. तरी शेतकरी बंधुंना आवाहन येते कि सर्व शेतकरी बंधूंनी मुदतीच्या आत खरीप हंगामाची आपली पिक पाहणी मोबाईल अँप द्वारे पूर्ण करून घ्यावी.
शेतकरी मित्रांनो, ईपीक पाहणी व्हर्जन 2.0 ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली गुगल प्ले स्टोअर लिंकवर क्लिक करा आणि आपली ई पीक पाहणी पूर्ण करून घ्या
तुमच्या मोबाईल मधील जुने E peek Pahani चे अॅप delete करून..... वरील लिंक वर जाऊन.....नवीन अॅप डाऊनलोड करा.... आणि आपल्या पिकाचा योग्य पेरा आपल्या शेतात जाऊनच भरा...
ई-पीक पाहणीचे फायदा
शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेता येतो.
7/12 उतारा नोंद होण्यास मदत होते.
पिक नुकसान मिळण्यास प्राधान्य.
पिक विमा मिळण्यास प्राधान्य.
पिक कर्ज घेण्यास प्राधान्य.
ई पीक पाहणी न केल्यास होणारे नुकसान
पीक कर्ज मिळणार नाही.
सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंद होणार नाही.
पिक विमा मिळणार नाही.
शासनाच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
📣 *मित्रांनो, अशाच प्रकारची नवनविन माहिती मिळवण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं 9309227903 तुमच्या ग्रुपमध्ये ऍड करा.* 🙏
Join To Watsapp Group 🌍
👇👇👇👇👇👇👇

Good Sir Information sir
उत्तर द्याहटवा